रु.100000/- ते 200000/- पावेतो 60 हप्ते व्याज दर- 12.50% टक्के
3.गृह कर्ज योजना – घरबांधनी/घरखरेदी/गाळा खरेदी/घरनुतनीकरण
कर्ज मर्यादा- सदर योजनेस कर्ज मर्यादा नाही. मात्र घरबांधणी कामाचे प्राकलन जेवढया रकमेचे असेल त्याचे 75 टक्के पावेतोची रक्कम व सर्व कपाती वजा जाता मिळणारे वेतनाचे रकमेवर येणारा घरबांधणी कर्जाचा हप्ता यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढया रकमेचे कर्ज मंजूर करता येईल. परतफेड –15 वर्ष (180 महिने) व्याज दर – 9% टक्के
4.सेवानिवृत्त सभासद कर्ज –
सेवानिवृत्त सभासदांना त्यांचे जमा असलेल्या अनिवार्य ठेवीच्या रकमेवर 75 टक्के पावेतो कर्ज
परतफेड -12 महिने व्याज दर – 10 टक्के.
5. मुदतठेव तारण कर्ज –
बॅंकेच्या मुदत ठेवीच्या 80 टक्के पावेतो सर्व खातेदारांना मुदत ठेव तारण कर्ज
व्याजदर – मुळ मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक