अ) दिलासा’ दुर्धर आजार योजना

१. या योजनेत बॅंकेतर्फे खालील ५ प्रकारच्या दुर्धर आजाराचे फक्त शस्त्रक्रियेकरीता रु.१००००/-पर्यंत बॅंकेचे सभासदांना मदत दिल्या जाते.

  • हदय उपमार्ग शस्त्रक्रिया व हदयाच्या ईतर शस्त्रक्रिया
  • अॅन्जीओप्लाॅस्टी शस्त्रक्रिया
  • मेंदुवरील शस्त्रक्रिया
  • मुत्रपिंड प्रतिरोपण
  • रक्ताचा कर्करोग व ईतर कर्करोग

नियम –
अ) वरील पाच दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रियेकरीता कौंटुबिक व्याख्येनुसार सभासद,सभासदाची
पत्नी/पती,मुलगा व अविवाहीत मुलगी यांचेकरीता ही आर्थिक सहाय्याची योजना सुरु आहे.
ब) आर्थिक सहाय्य म्हणून रु.१००००/-(रु.दहा हजार)एवढी रक्कम देण्यात येईल.या रकमेचा धनादेश ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया होईल त्या दवाखान्याचे नावांनी अदा केल्या जाईल.
क) सभासदांनी साध्या कागदावर अर्ज करावा, त्यामध्ये बॅंकेचा सभासद क्रमांक,खाते क्रमांक,कार्यरत असल्याचे ठिकाण,तसेच पुरावा म्हणून आधार कार्ड,रहिवासी दाखला,पॅन कार्ड ,दवाखान्यात शस्त्रक्रियेकरीता भरती असल्याबाबत किंवा वरील दुर्धर आजारासंबंधी शस्त्रक्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रियेचे खर्चासबंधी चे बिल तथा डिस्चार्ज पेपर इ. बाबीसह प्रस्ताव संबंधीत शाखेमार्फत सादर करावा.
ड) एकदा आर्थिक सहाय्य दिल्यानंतर पुन्हा आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.तरी बॅंकेचे सभासदाप्रति असलेली भावना हि बाब प्राधान्याची मानून आर्थिक सहाय्य फुल ना फुलाची पाकळी या नात्याने देऊन बॅंक आपले दायित्व पार पाडीत आहे तरी सभासदांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा.