योजना

अ) दिलासा’ दुर्धर आजार योजना

१. या योजनेत बॅंकेतर्फे खालील ५ प्रकारच्या दुर्धर आजाराचे फक्त शस्त्रक्रियेकरीता रु.१००००/-पर्यंत बॅंकेचे सभासदांना मदत दिल्या जाते.

 • हदय उपमार्ग शस्त्रक्रिया व हदयाच्या ईतर शस्त्रक्रिया
 • अॅन्जीओप्लाॅस्टी शस्त्रक्रिया
 • मेंदुवरील शस्त्रक्रिया
 • मुत्रपिंड प्रतिरोपण
 • रक्ताचा कर्करोग व ईतर कर्करोग

नियम –
अ) वरील पाच दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रियेकरीता कौंटुबिक व्याख्येनुसार सभासद,सभासदाची
पत्नी/पती,मुलगा व अविवाहीत मुलगी यांचेकरीता ही आर्थिक सहाय्याची योजना सुरु आहे.
ब) आर्थिक सहाय्य म्हणून रु.१००००/-(रु.दहा हजार)एवढी रक्कम देण्यात येईल.या रकमेचा धनादेश ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया होईल त्या दवाखान्याचे नावांनी अदा केल्या जाईल.
क) सभासदांनी साध्या कागदावर अर्ज करावा, त्यामध्ये बॅंकेचा सभासद क्रमांक,खाते क्रमांक,कार्यरत असल्याचे ठिकाण,तसेच पुरावा म्हणून आधार कार्ड,रहिवासी दाखला,पॅन कार्ड ,दवाखान्यात शस्त्रक्रियेकरीता भरती असल्याबाबत किंवा वरील दुर्धर आजारासंबंधी शस्त्रक्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रियेचे खर्चासबंधी चे बिल तथा डिस्चार्ज पेपर इ. बाबीसह प्रस्ताव संबंधीत शाखेमार्फत सादर करावा.
ड) एकदा आर्थिक सहाय्य दिल्यानंतर पुन्हा आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.तरी बॅंकेचे सभासदाप्रति असलेली भावना हि बाब प्राधान्याची मानून आर्थिक सहाय्य फुल ना फुलाची पाकळी या नात्याने देऊन बॅंक आपले दायित्व पार पाडीत आहे तरी सभासदांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा.

ब) सभासद अपघात विमा योजना

बँकेनी नुकतीच जुन २०१९ पासून सभासदांचे कर्ज सुरक्षित राहण्याचे दृष्टीने नविन योजनेसह रु. १२ लाख विमा जोखीमची योजना कार्यान्वित केलेली आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे-

 • सभासदांचा अपघाताने मृत्यू झाल्यास रु. १२ लाखाचा विमा मिळण्यास पात्र ठरेल.बॅंकेचे कर्ज बाकी असल्यास तेवढी रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम त्यांचे वारसदारास अदा केल्या जाईल.
 • याव्यतिरिक्त मृतकाच्या दोन अविवाहित पाल्यास प्रत्येकी रु. २५००० /- प्रमाणे आर्थिक मदत (वय २५ पावेतो ).
 • मृतकाचे शव नेण्याबाबत रुग्णवाहीकेचा खर्च रु.२५००/- पावेतो.(मात्र रुग्णवाहीकेचे बिल सादर केल्यास)
 • अपघातामध्ये सभासदाचा एक अवयव पुर्णतः निकामी झाल्यास विमा जोखीमच्या ५० टक्के रक्कम मिळण्यास पात्र.
 • कोणतेही दोन अवयव निकामी झाल्यास १०० टक्के विमा संरक्षण .
 • अपघातानंतर रुग्णास दवाखान्यात रुग्णवाहिकेद्वारे नेण्याचा खर्च रु. २०००/- पावेतो .
 • अपघात झाल्यानंतर दवाखान्यात २४ तासाच्या वर भरती राहिल्यास मेडिकल खर्च २५ हजारापर्यंत

 

नियम-

 • १. अपघातासंबंधीची सुचना सभासदांचे नातेवाईकांनी किंवा सभासद मित्रानी १५ दिवसात संबंधीत शाखेला दयावी.
 • २. अपघातासंबंधाने पोलीस विभागाकडून संबंधीत कागदपत्रे, जसे-घटनास्थळाचा पंचनामा,एफआयआर. ई. कागदपत्रे तसेच दवाखान्यासंबंधाने दवाखान्यात भरती पासून डिस्चार्ज पावेतो तसेच पोस्टमार्टमसह सर्व कागदपत्रे असल्यासस विमा कंपनीकडून दावा मिळेल.

क) तातडीची आर्थिक मदत

बॅंकेच्या भागधारक सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबास रु. ५०००/- आर्थिक मदत.

ड)गुणगौरव योजना

सभासदांचे पाल्य असलेल्या 10 वी व 12 वी च्या गुणवंत पाल्याचा सत्कार

इ) भविष्यातील योजना –

स्पर्धेत टिकून राहण्याकरीता तसेच बॅंकेच्या सभासदांना आणि खातेदारांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्याकरीता बॅंक नेहमीच अग्रेसर राहिली आहे.त्याकरीता अधिकाधिक नव्या तंत्रज्ञांनाचा वापर करण्याकडे बॅंकेचा कल राहीलेला आहे.आज बॅंकेच्या सर्व शाखा संगणीकृत होवून सी.बी.एस.प्रणाली लागू झालेली आहे. भविष्यातील पावले लक्षात घेता कॅशलेस व्यवहारास प्राधान्य देवून बॅंकेनी आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी सुविधा यशस्वीरित्या सुरु केली आहे.लवकरच एसीएच तसेच एटीएम सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.तसेच आधार बेस पेमेंट,मोबाईल बॅकिग करण्याचा प्रयत्न आहे.

ई ) सभासदांना सुचना

 • सेव्हिंग व कर्ज खात्याच्या नोंदी वेळोवेळी तपासून घ्या.
 • कर्जाचे हप्ते तसेच आर.डी.चे हप्ते दर महिन्याला न चुकता भरा.
 • बॅंकांना तसेच इतरत्र दिलेले चेक बाउंस होणार नाही त्याकरीता खात्यात पुरेशी रक्कम जमा ठेवा
 • शेअर्सचा एक भाग १००चा झाल्यामुळे कमी असलेला शेअर्स पूर्ण करा.
 • आपली के.वाय.सी. पूर्ण करुन घ्या.
 • बॅंकेच्या सर्व सोयीचा लाभ घ्या आणि बॅंकेच्या प्रगतीस हातभार लावा.

सभासद कर्ज मुक्ती योजना

सध्याच्या गतिमान परिस्थितीत माणसाला आपल्या कुटुंबाकरिता अर्थात मुलाबाळांकरिता त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने
आपले नोकरीत तो काही आर्थिक तजवीज करून ठेवतो त्याकरिता त्याला बँकेकडून कर्ज सुद्धा काढावे लागते .
आजचे धकाधकीचे काळात वाढते अपघात व गंभीर आजाराशी संघर्ष करून काही सन्मा. सभासदांना आपला
जीव गमवावा लागतो. अश्यातच त्यांचेवर बँकेच्या कर्जाचा बोजा असतो, आणि मृत्यूपश्चात कर्जाची जबाबदारी
वारसदारांवर येते आणि कर्ज एन. पी. ए. मध्ये जाते, बँकेची अपघात विमा योजना आहे परंतु या योजनेचा लाभ
फक्त अपघाताने मृत्यू पावलेल्या कर्जदार सभासदांना होतो. नैसर्गिक मृत्यू पावलेल्या सभासदांना त्याचा फायदा
होत नाही तेव्हा वरील सर्व बाबींचा विचार करता बँकेच्या सभासदांप्रती असलेली भावना हि बाब प्राधान्याची मानून
त्यांना अर्थ साहाय्य देऊन कर्ज मुक्त करण्याकरिता संचालक मंडळाने हि योजना कार्यान्वित केलेली आहे .

नियम व अटी :-

१) या योजनेमध्ये कर्जदार सभासदांकडून रुपये १५००/- नापरतावा एकरकमी रक्कम दरवर्षी त्यांचेकडून जमा केल्या जाईल
(कर्जदाराचे कर्जखात्याला नावे टाकून )
२) रुपये १५००/- मधून अपघात विमा हप्त्याची रक्कम रुपये ६८०/- व रुपये ८२०/- सभासद कर्ज मुक्ती योजनेस वर्गीकरण
करण्यात येईल .
३)  अ . योजनेत सहभागी सभासदांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास सादर योजनेतून रुपये ४ लाख त्याचे कर्ज खात्यात जमा केल्या
जाईल . कर्ज नसल्यास त्याचे वारासदारास धनादेशाद्वारे रक्कम अदा केल्या जाईल. अशी रक्कम संबंधितांचे कर्जखात्यात
परस्पर वळती करण्याचे अधिकार बँकेकडे राहील.
ब .  जर सभासदांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा क्लेम विमा कंपनीकडे सादर केल्या जाईल. विमा कंपनीकडून क्लेम मंजूर
झाल्यानंतर रुपये १२ लाख मिळण्यास पात्र राहील.
क .  वरील ३ ( ब )  नुसार अपवादात्मक परिस्थितीत विमा कंपनीकडून अपघाती मृत्यूबाबत विमा क्लेम नाकारल्यास अश्या
मृत सभासदांच्या वारासदारास सभासद कर्ज मुक्ती योजनेचा रुपये ४ लाख लाभ मिळण्यास पात्र राहील.
४) सहभागी सभासद वरील ३ ( अ ) किंवा ३ ( ब ) यापैकी कोणताही एक लाभ मिळण्यास पात्र राहील . कोणत्याही परिस्थितीत
वरीलपैकी दोन्हीही लाभ मिळण्यास मृत सभासदांच्या वारासदारास दावा करता येणार नाही .
५) कर्जदार नसलेले सर्वसामान्य सभासद सुद्धा या योजनेत सामील होऊ शेकेल .
६) योजनेअंतर्गत लाभ फक्त योजनेमध्ये समाविष्ठ असणाऱ्या मृत सभासदांच्या वारासदारांनाच देण्यात येईल . सर्व सामान्य
सभासदांना याचा लाभ मिळणार नाही .
७) योजनेचा लाभ हा निधी गोळा केल्याच्या तारखेच्या दुसर्या दिवसापासून देय राहील .
८) योजनेत जास्तीत जास्त वयाच्या ५८ वर्षापर्यंत सहभागी होता येईल व वर्ग ४ चे सभासदांकरिता ६० वर्षापर्यंत सहभागी होता येईल
सेवानिवृत्ती नंतर या योजनेचे सभासदत्व आपोआप रद्द समजण्यात येईल .
९) या योजनेत जमा होणारा निधी बँकेच्या ताळेबंद पत्रकामध्ये राखीव निधी व इतर निधी या शीर्षकात स्वतंत्र दाखविल्या जाईल .
१०) प्रत्येक वर्षी योजनेची रक्कम भरणाऱ्या सभासदाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ मरणोत्तर दिल्या जाईल .
११) कोणत्याही कारणाने सदर योजनेची कपात झालेली नाही असे निदर्शनास आल्यास तेव्हढी रक्कम कर्ज खात्याला नावे टाकल्या
जाईल . याबाबत शाखाधिकारी यांना अधिकार राहील .
१२) मृत्यूबाबतचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत सचिव / नगरपालिका / खंडविकास अधिकारी / शासकीय रुग्णालयाचे अधिकारी / डॉक्टर
यांनी दिले असले पाहिजे
१३) या योजनेअंतर्गत आलेले मागणी अर्ज मुख्यालयास प्राप्त झाल्यापासून ३० दिवसाचे आत अथवा निधी उपलब्धतेनुसार निकाली
काढल्याजाईल व हा व्यवहार बँकेच्या मुख्यालयातूनच होईल .
१४) या योजनेतील निधीचा कोणताही भाग नफा वाटणीसाठी घेण्यात येणार नाही . प्रत्येक वर्षी किती सभासदांना योजनेचा लाभ दिला
याचा तपशील बँकेच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध केल्या जाईल .
१५) मृत पावलेल्या सभासदाचे वारसाकडून साध्या कागदावर अर्ज करून मृत्यूचे प्रमाणपत्र सांक्षांकित करून तसेच सोबत आधार कार्ड ,
पॅन कार्ड तसेच वारस असल्याबाबत रुपये १००/- चे स्टॅम्प पेपर वर ऍफिडेव्हिट ( प्रतिज्ञालेख ) करून द्यावे लागेल .
१६) जर सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास सभासदाचे अंतिम संस्काराकरिता त्याला देय असलेल्या योजनेतील रक्कम रुपये ४ लाखांमधून
रुपये २५०००/- देण्यात येईल व उर्वरित रक्कम रुपये ३७५०००/- सर्व कार्यवाही अंती देण्यात येईल .
१७) मृत सभासदाच्या अर्जावर योजनेचा लाभ देण्याबाबत मंजुरीचे अधिकार बँकेचे अध्यक्ष व मुकाअ यांना राहील व अध्यक्षांचे टिप्पणीवरून
मंजुरी वरून सदर रक्कमेचे समायोजन कर्जखात्याला करण्यात येईल . त्यामुळे कर्जखाते एन . पी . ए . मध्ये जाणार नाही व यास पुढे
येणाऱ्या संचालक मंडळ सभेत कार्योत्तर मंजुरी घेण्यात येईल .
१८) सदर योजनेकरिता ज्यादिवशी सभासदाकडून रक्कम जमा केली त्यादिवसापासून १ वर्षापावेतो तो सभासद या योजनेस पात्र राहील .
१९) सदर योजना बँकेतील ककर्मचारी / दैनिक एजंट यांना सुद्धा लागू राहील .
२०) एखाद्या कर्जदार सभासदाने विमा हप्ता भारला परंतु सेवेतून निवृत्त झाला तरी त्याला हप्ता भरण्याच्या दिनांकापासून १ वर्षाच्या
कालावधीकरिता लाभ मिळण्यास तो पात्र राहील .
२१) या योजनेतील कोणत्याही सहभागी सभासदाला त्यांनी जमा केलेल्या रक्कमेची मागणी करण्याचा अधिकार असणार नाही .