योजना

अ) दिलासा’ दुर्धर आजार योजना

१. या योजनेत बॅंकेतर्फे खालील ५ प्रकारच्या दुर्धर आजाराचे फक्त शस्त्रक्रियेकरीता रु.12000/-पर्यंत बॅंकेचे सभासदांना मदत दिल्या जाते.

  • हदय उपमार्ग शस्त्रक्रिया व हदयाच्या ईतर शस्त्रक्रिया
  • अॅन्जीओप्लाॅस्टी शस्त्रक्रिया
  • मेंदुवरील शस्त्रक्रिया
  • मुत्रपिंड प्रतिरोपण
  • रक्ताचा कर्करोग व ईतर कर्करोग

नियम –
अ) वरील पाच दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रियेकरीता कौंटुबिक व्याख्येनुसार सभासद,सभासदाची
पत्नी/पती,मुलगा व अविवाहीत मुलगी यांचेकरीता ही आर्थिक सहाय्याची योजना सुरु आहे.
ब) आर्थिक सहाय्य म्हणून रु.12000/-एवढी रक्कम देण्यात येईल.
क) सभासदांनी साध्या कागदावर अर्ज करावा, त्यामध्ये बॅंकेचा सभासद क्रमांक,खाते क्रमांक,कार्यरत असल्याचे ठिकाण,तसेच पुरावा म्हणून आधार कार्ड,रहिवासी दाखला,पॅन कार्ड ,दवाखान्यात शस्त्रक्रियेकरीता भरती असल्याबाबत किंवा वरील दुर्धर आजारासंबंधी शस्त्रक्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रियेचे खर्चासबंधी चे बिल तथा डिस्चार्ज पेपर इ. बाबीसह प्रस्ताव संबंधीत शाखेमार्फत सादर करावा.
ड) एकदा आर्थिक सहाय्य दिल्यानंतर पुन्हा आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.तरी बॅंकेचे सभासदाप्रति असलेली भावना हि बाब प्राधान्याची मानून आर्थिक सहाय्य फुल ना फुलाची पाकळी या नात्याने देऊन बॅंक आपले दायित्व पार पाडीत आहे तरी सभासदांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा.

ब) सभासद अपघात विमा योजना

बँकेनी नुकतीच जुन 2024 पासून सभासदांचे कर्ज सुरक्षित राहण्याचे दृष्टीने नविन योजनेसह रु. 20 लाख विमा जोखीमची योजना कार्यान्वित केलेली आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे-

  • सभासदांचा अपघाताने मृत्यू झाल्यास रु. 20 लाखाचा विमा मिळण्यास पात्र ठरेल.बॅंकेचे कर्ज बाकी असल्यास तेवढी रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम त्यांचे वारसदारास अदा केल्या जाईल.

 

नियम-

  • १. अपघातासंबंधीची सुचना सभासदांचे नातेवाईकांनी किंवा सभासद मित्रानी १५ दिवसात संबंधीत शाखेला दयावी.
  • २. अपघातासंबंधाने पोलीस विभागाकडून संबंधीत कागदपत्रे, जसे-घटनास्थळाचा पंचनामा,एफआयआर. ई. कागदपत्रे तसेच दवाखान्यासंबंधाने दवाखान्यात भरती पासून डिस्चार्ज पावेतो तसेच पोस्टमार्टमसह सर्व कागदपत्रे असल्यासस विमा कंपनीकडून दावा मिळेल.

क) तातडीची आर्थिक मदत

बॅंकेच्या भागधारक सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबास रु. 10,000/- आर्थिक मदत.

ड)गुणगौरव योजना

सभासदांचे पाल्य असलेल्या 10 वी व 12 वी च्या गुणवंत पाल्याचा सत्कार

इ) भविष्यातील योजना –

स्पर्धेत टिकून राहण्याकरीता तसेच बॅंकेच्या सभासदांना आणि खातेदारांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्याकरीता बॅंक नेहमीच अग्रेसर राहिली आहे.त्याकरीता अधिकाधिक नव्या तंत्रज्ञांनाचा वापर करण्याकडे बॅंकेचा कल राहीलेला आहे.आज बॅंकेच्या सर्व शाखा संगणीकृत होवून सी.बी.एस.प्रणाली लागू झालेली आहे. भविष्यातील पावले लक्षात घेता कॅशलेस व्यवहारास प्राधान्य देवून बॅंकेनी आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी सुविधा यशस्वीरित्या सुरु केली आहे.लवकरच एसीएच तसेच एटीएम सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.तसेच आधार बेस पेमेंट,करण्याचा प्रयत्न आहे.

ई ) सभासदांना सुचना

  • सेव्हिंग व कर्ज खात्याच्या नोंदी वेळोवेळी तपासून घ्या.
  • कर्जाचे हप्ते तसेच आर.डी.चे हप्ते दर महिन्याला न चुकता भरा.
  • बॅंकांना तसेच इतरत्र दिलेले चेक बाउंस होणार नाही त्याकरीता खात्यात पुरेशी रक्कम जमा ठेवा
  • शेअर्सचा एक भाग 1000 चा झाल्यामुळे कमी असलेला शेअर्स पूर्ण करा.
  • आपली के.वाय.सी. पूर्ण करुन घ्या.
  • बॅंकेच्या सर्व सोयीचा लाभ घ्या आणि बॅंकेच्या प्रगतीस हातभार लावा.